Tag: Cyber Crime
-
१ कोटी ३६ लाख मोबाईलची सेवा खंडित, सायबर गुन्हेगारीवर मोठा प्रहार
•
नवी दिल्ली: सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, १ कोटी ३६ लाखांहून अधिक मोबाईल क्रमांकांची सेवा खंडित करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत ही माहिती दिली. दूरसंचार विभागाने नागरिकांकडून आलेल्या प्रतिक्रिया आणि तक्रारींच्या आधारावर ही कारवाई केली आहे. डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना…
-
महिला पोलीस कमिटीच्या ग्रुपमध्ये हॅकरची एन्ट्री: एका क्लिकवर पोलिसांचे साडेसात लाख गायब
•
मुंबई: कायदा आणि सुव्यवस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रोम्बे पोलिसांच्या महिला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये हॅकरने प्रवेश करत एक बनावट फाईल शेअर केली. या फाईलवर एका क्लिकमुळे पोलिसांचे साडेसात लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सायबर गुन्हेगारांनी पोलिसांच्या नावाने कर्ज काढून ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली असल्याचे समोर आले आहे. ट्रोम्बे…
-
राज्यात सायबर फसवणुकीचा ८२२ कोटींचा गंडा; केवळ १०% गुन्हे उघडकीस
•
मुंबई: महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून, जानेवारी ते मे २०२५ या अवघ्या चार महिन्यांत नागरिकांना तब्बल ८२२.९७ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात २,६६८ सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यापैकी केवळ २६७ (सुमारे १०%) गुन्हे उघडकीस आले आहेत आणि २४९ आरोपींना अटक करण्यात आली…
-
७५ लाख रुपयांची सायबर फसवणूक उघडकीस, ड्रायव्हर आणि महिलेला अटक
•
नवी मुंबई : येथील सायबर पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई करत ७५ लाख रुपयांच्या हायटेक ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या संघटित सायबर गुन्ह्यात एका ड्रायव्हर आणि एका गृहिणीची भूमिका समोर आली आहे, ज्यांनी स्वतःला एका प्रतिष्ठित कंपनीचे संचालक असल्याचे सांगून मोठी रक्कम लाटली. पोलिसांनी सांगितले…
-
पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या मोठ्या घटना, ५ महिन्यांत २१ जणांना कथित डिजिटल अरेस्ट
•
पुणे: पुणे आता सायबर गुन्ह्यांचे केंद्र बनण्याकडे वाटचाल करत आहे. कारण गेल्या ५ महिन्यांत एकट्या पुण्यात डिजिटल अटकेचे २१ गुन्हे नोंदवले गेले आहेत. या २१ प्रकरणांमध्ये एकूण ९ कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे पुण्यात सायबर फसवणूक करणारे वर्चस्व गाजवत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तुमचे सिम ब्लॉक केले…
-
पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद
•
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना…
-
खोटी ओळख, खरी फसवणूक;आसाममध्ये ‘जामतारा पॅटर्न क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा
•
सायबर गुन्हेगारी ही बिहारच्या जामतारापुरती मर्यादित राहिली नसून, देशाच्या कानाकोपऱ्यात सायबरचोरांच्या टोळ्या तयार होत आहेत.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आसाममधील मोरगाव जिल्ह्यात अशीच एक ‘जामतारा पॅटर्न’ टोळी उघडकीस आणली आहे.बँकांना बनावट आधार व पॅनकार्डच्या आधारे गंडवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी ते जून २०२४ या काळात ५५…
-
सीबीआयचं ‘ऑपरेशन चक्र-V’ गाजलं; डिजिटल अरेस्टच्या जाळ्यातील चौघे गजाआड; 7.67 कोटींची सायबर लूट उघड
•
डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक अत्यंत चतुर आणि घातक पद्धत आहे. यात भामटे पोलिस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा ड्रग विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून पीडितेला फोन करतात.
-
म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका
•
सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे.
-
विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
•
प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता