Tag: Eknath Shinde
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण: ‘फडणवीसांसोबत कोणताही मतभेद नाही’
•
नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले आपले संबंध आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असेल, असेही त्यांनी…
-
एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांना दिली कडक शब्दात समज
•
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिमा त्यांच्याच नेत्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे डागाळली आहे. विशेषतः आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे शिंदे अडचणीत आले आहेत. या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने शिंदे कमालीचे नाराज असून, त्यांनी दोघांनाही कडक शब्दांत समज दिल्याचे समजते.आमदार संजय…
-
धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव: १४ जुलै रोजी सुनावणी
•
नवी दिल्ली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उद्धवसेना) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला. खंडपीठाने या याचिकेवर…
-
ठाकरे-शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले: “किल मी” विरुद्ध “मरे हुए को क्या मारना”
•
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र झाले आहे. दोन्ही गटांनी आपापल्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मेळावे घेतले, जिथे एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून शिंदे गटाला आव्हान देत “कम ऑन किल मी, पण येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या” असे म्हटले,…
-
भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का: पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील आर्थिक नियंत्रण सरकारकडे
•
मुंबई: भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मोठ्या प्रकल्पांचे आर्थिक नियंत्रण स्वतःकडे घेतले आहे. हा निर्णय राज्यातील राजकीय आणि आर्थिक समीकरणात मोठा बदल घडवणारा मानला जात आहे.…
-
शिवसेना वर्धापनदिन: उद्धव आणि शिंदे गटांमध्ये मुंबईत स्वतंत्र कार्यक्रम
•
मुंबई: शिवसेनेचा १९ जून रोजी मूळ एकसंघ ‘५९’वा वर्धापनदिन साजरा होत आहे. मात्र, दुफळीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे दोन्ही पक्ष आपापले स्वतंत्र वर्धापनदिन सोहळे आयोजित करत आहेत. मुंबईतील पालिका निवडणुकांच्या तोंडावर होणारे हे सोहळे आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी पाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकप्रकारे पालिका निवडणूक प्रचाराचा…
-
पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?
•
देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण…
-
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
•
अमरावती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना (यूबीटी) वरही निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेसच्या काळात घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन जीवन देण्याचे काम…
-
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी साधला संवाद
•
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. ही एक दुःखद घटना असल्याचे ते म्हणाले. या दुःखाच्या वेळी ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वे काम करत आहे. सोमवारी (९ जून) रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, त्यांनेच सोडली उद्धव ठाकरेंची सोडली साथ
•
सांगली : जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते. चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला…