Tag: IMD
-
मुंबईसाठी हवामान विभागाने इशारा बदलला; येलो ऐवजी रेड अलर्ट जारी
•
मुंबई : मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या भागांना येल्लो अलर्ट दिला होता. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवामान विभागाने आपला अंदाज बदलला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड येथे हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला…
-
मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
•
बीड : मराठवाडा आणि विदर्भाला भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. बीड जिल्ह्यात नुकतंच मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं जमिनीवर कोसळले आहे तर. वादळी वाऱ्यांमुळे एका पेट्रोल पंपाचे नुकसान झाले आहे. आणि पुढील 24 तास बीड…
-
पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित मे महिन्यात उष्णतेपासून सुटका
•
मुंबई : उर्वरित मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान…
-
राज्यातील काही भागात गारपिटीची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
•
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. आता राज्यात गारपिटीसह पाऊस तर मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. कारण अवेळी पडणारा पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांवर मोठा परिणाम होतो. मागील काही वर्षात अनेकदा या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं…
-
हवामान विभागाकडून मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
•
देशाच्या अनेक भागात वादळी हवामान असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारपासून मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे. वादळांसह हलक्या ते मध्यम सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे दिवसाच्या उष्णतेच्या पातळीतही घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान जवळजवळ ३१ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज…
-
राज्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
•
भारतीय हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यात उष्णतेने नागरिक हैराण आहेत. अशातच आता विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मिश्र स्वरुपाचे वातावरण राहण्याचा…