Tag: mahesh mhatre blog
-
पिठोरी_अमावस्या…मातृदिन
•
“पिठोरीचा सण’ म्हणजे मातृत्वाचा आनंद सोहळा ! एक आई आपल्या बाळाच्या जन्मासाठी, त्याच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी प्रार्थना करते; म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्रात तरी *”मराठी मातृ दिन” म्हणुन साजरा केला जातो…. आईच्या अनंत उपकारांचे मनःपूर्वक स्मरण करण्याचा हा सोनेरी दिवस… म्हणून माझ्या आईविपयीचा, सौ. रजनी बळीराम म्हात्रे,…
-
‘वकिलांचा विठ्ठल’
•
“झाड जाणावे फुले…माणूस जाणावा बोले” अशी एक म्हण आहे. तिचा प्रत्यय मला सुमारे तेरा वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. निमित्त होते, पहिल्या वकील परिषदेचे आणि नामवंत विधिज्ञ विठ्ठल कोंडे देशमुख यांच्या भाषणाचे. या राज्यभरातील वकिलांच्या उपस्थितीने गजबजलेल्या अधिवेशनाचा विषय होता, “भारताच्या लोकशाही सक्षमीकरणाच्या कार्यात वकिलांचे योगदान”. आपल्या प्रास्ताविक भाषणात बार कौन्सिल…
-
माहितीच्या महापुरात दिसलेली तीन माणसे आणि त्यांच्या तीन बातम्या – महेश म्हात्रे
•
माहितीच्या युगात, आधुनिक तंत्रज्ञान जिवनव्यापी… इतके की, जीव गुदमरतो…क्षणोक्षणी, त्याला जोड प्रसार माध्यमांची, ढगफुटी व्हावी तशा अंगावर येणार्या बातम्यां… थोड्या आवश्यक, बहुतेक निरर्थक… आणि त्या अफाट प्रवाहात आपण वाहून चाललोय, जोरात. आमचे पाय अधांतरी, नाका – डोळ्यात जातंय पाणी, अनावश्यक शब्दांचे… च्याट जीपीटी रुतून बसलाय मेंदूत बोटं करताहेत स्क्रोल, अविरत…
-
आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…
•
श्रावणसूक्त ! हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला…. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक…
-
पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?
•
देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण…
-
“सब कुछ मुळ्ये काका” आणि पहिल्या पत्रकार संमेलनाचे महत्व!
•
नाट्यकर्मी अशोक मुळ्ये ऊर्फ मुळ्ये काका, ज्यांची अफलातून आणि अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विशेष ख्याती आहे. गेल्या वीस वर्षांपासून, सामाजिक भान ठेवून कार्यक्रम कसे आयोजित करता येतात, याचा आदर्श वस्तुपाठ मुळ्ये काका यांनी घालून दिला आहे. तर या अशा, मुळ्ये काका यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा भरलेल्या पत्रकार संमेलनाचे आयोजन परवा, रविवारी…
-
एस.एम.देशमुख; एक ‘सार्वजनिक’ पत्रकार
•
महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार पत्रकारांचे नेतृत्व करणारे एस.एम.देशमुख म्हणजे, उत्साहाचा अखंड धबधबा. सतत कार्यमग्न राहणारे एस.एम. हे गावोगावी विखुरलेल्या पत्रकारांच्या सुखदुःखात सामील होणारे खंबीर कुटुंबप्रमुख आहेत. पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि समाजाच्या हितासाठी अखंड राबणारे एस एम सर दीर्घायुषी होवोत या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ! “पत्रकारांनी सामााजिक जबाबदारीचं भान ठेऊन…
-
अक्षय्य “परोपकारी” तृतीया
•
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. “कालविवेक”या ग्रंथामध्ये अक्षय्य तृतीयाच्या दिवशी मनाला आनंदी, संयमी ठेवण्याचे व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. पण आपल्याकडे या दिवशी गृहप्रवेश, वाहन, सोने किंवा कोणतीही मौल्यवान खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. बाहेर वैशाख वणवा पेटत असताना, मनात निश्चयाचे बीज जपावे, आपल्यापेक्षा दुसर्यांच्या आनंदाचा,…
-
स्मृतिस्मरण थोरल्या बाजीरावांचे…
•
मराठा साम्राज्याची पताका अटकेपार फडकवणारे रणधुरंधर पेशवा बाजीराव ज्यांच्या काळात मराठ्यांची सत्ता जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर होती…मोठमोठी सरदार घराणी यांच दरम्यान उदयास आली… असे महापराक्रमी पेशवे बाजीराव यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन ! थोरले बाजीराव पेशवे हे सुमारे सहा फूट उंच, भक्कम आणि पिळदार शरीरयष्टीचे होते. त्यांच्या तेजस्वी कांतीमुळे आणि तांबुस…
-
मित्रहो, ही कुठली पत्रकारिता?
•
मराठी पत्रकारिता कुठल्या वळणावर पोहोचली आहे, हे मी पत्रकार असल्यामुळे जास्त कधी बोलत नाही. पण मराठी पत्रकारितेत झालेला हा लक्षणीय बदल अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बोलावसं वाटलं. तुम्हीच पहा, आपल्या पत्रकारितेची घसरण दर्शविण्यासाठी आजच्या पुढील दोन बातम्या पुरेशा आहेत… माझ्यासाठी त्या बातम्या नसून, मन हादरवून टाकणारे पत्रकारितेचे विदारक स्वरुप आहे……