Tag: Mahesh Mhatre
-

जेएनयूतील प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरणात बडतर्फ; जपानी दूतावासाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर कारवाई
•
जपानी दूतावासाने विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, संबंधित प्राध्यापकाने दूतावासातील अधिकाऱ्यावर अश्लील आणि लज्जास्पद लैंगिक टिप्पणी केली होती.
-

बीडमध्ये युवकांसाठी औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय; ‘सीआयआयआयटी’ प्रकल्पासाठी १९१ कोटींची गुंतवणूक
•
बीड जिल्ह्यातील युवकांना उद्योगसक्षम बनवून त्यांच्यासमोर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग’ (CI3T) म्हणजेच ‘सीआयआयआयटी’ हे केंद्र बीडमध्ये स्थापन होणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांतच…
-

हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, पुस्तकं विकू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा
•
राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे काय म्हणाले केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न…
-

मराठवाड्यात तीन महिन्यांत २६९ शेतकरी आत्महत्या; बीड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ प्रकरणे
•
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. चालू वर्षातील केवळ पहिल्या तीन महिन्यांत – १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत – मराठवाडा विभागात एकूण २६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, ही सरासरी दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याची…
-

चितळे बंधू ब्रँडचा गैरवापर: पुण्यात फसवणुकीचा प्रकार उघडकीस
•
पुण्यातील प्रसिद्ध मिठाई निर्माता चितळे बंधू यांच्या ब्रँडचे गैरवापर करून एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘चितळे स्वीट होम’च्या मालकाने चितळे बंधू ब्रँडच्या नावाचा वापर करून पुण्याच्या प्रसिद्ध बाकरवडीचे उत्पादन तयार केले आणि त्याची विक्री ऑनलाइन तसेच ऑफलाइन केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चितळे…
-

उर्दू भारतीय भाषा, कोणत्याही धर्माशी तिचा संबंध नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
•
उर्दू ही लोकभाषा आहे. ती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही आणि मराठीसह तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,” असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या उर्दू फलकाला विरोध करणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली.भाषिक विविधतेचा आदर राखणे गरजेचे असून, उर्दूसह सर्व भाषांशी मैत्री करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ति…
-

जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाटचाल मजबूत; रिपोर्टनुसार २०२५ मध्ये ६.५% वाढीचा अंदाज
•
जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असतानाही भारताची अर्थवृद्धी वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने (UNCTAD) प्रसिद्ध केलेल्या ‘ट्रेड अॅण्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट अपडेट २०२५’ या अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था चालू वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये ६.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत जगातील सर्वांत वेगाने…
-

देशातील पहिली एटीएम सेवा आता धावत्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये; प्रवाशांना मिळणार प्रवासादरम्यान रोख रकमेची सोय
•
धावत्या रेल्वेत रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मध्य रेल्वेचा उपक्रम यशस्वी ठरला आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यात आली असून, ही सुविधा मिळवणारी देशातील पहिलीच एक्सप्रेस ट्रेन आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यानही सोयीस्करपणे पैसे काढता येणार असून, याचा थेट फायदा प्रवाशांसह रेल्वेच्या…
-

उष्णतेच्या झळांमुळे राज्यात फळबागा आणि भाजीपाला करपला
•
राज्यात अनेक भागांमध्ये तापमान ४० अंशांवर पोहोचल्यामुळे तीव्र उष्णतेच्या झळांनी फळबागा, भाजीपाला आणि नव्याने लावलेली रोपे करपत आहेत. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडी आणि पालेभाज्यांवर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. उन्हाळी पावसाने दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमानामुळे…
-

‘बनावट डॉक्टर’ प्रकरणाचा परिणाम : दामोहच्या मिशन हॉस्पिटलचा परवाना तात्पुरता निलंबित
•
हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा बनावट दावा करणाऱ्या डॉक्टरमुळे झालेल्या रुग्णमृत्यूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादानंतर, दामोह येथील मिशन हॉस्पिटलची नोंदणी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. एम. के. जैन यांनी बुधवारी दिली. डॉ. जैन यांनी स्पष्ट केले की, हॉस्पिटलला नवीन रुग्ण दाखल करण्यास मनाई…
