Tag: Mahesh Mhatre
-
कला क्षेत्रातील दोन ‘ऋषितुल्य’ व्यक्तिमत्त्व पद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री कामत यांचा होणार सन्मान
•
मुंबई: चित्रपट आणि चित्रकला क्षेत्रातील दोन प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व, पद्मभूषण श्री. राजदत्त आणि पद्मश्री श्री. वासुदेव कामत, यांच्या सन्मानार्थ संस्कार भारती, कोकण प्रांत यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा पार पडेल.’अभ्यासोनि प्रकटावे’ या…
-
परिचारिकांचा संप अखेर मिटला; ‘स्टाफ नर्स’ आता ‘परिचर्या अधिकारी’
•
मुंबई: गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील परिचारिकांचा संप अखेर गुरुवारी संपुष्टात आला आहे. सरकारने परिचारिकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आला. यापुढे ‘स्टाफ नर्स’ या पदनामाऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’ (परिचर्या अधिकारी) असे नवीन पदनाम असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. महाराष्ट्र राज्य…
-
आनंददायी श्रावण महिन्याचा आरंभ बिंदू…
•
श्रावणसूक्त ! हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला…. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या शब्दातून उमटलेल्या या शब्दओळी श्रावणाचे सोनकोवळे, आरस्पानी रूपसौंदर्य मोठ्या नजाकतीने डोळ्यासमोर उभे करतात. हा महिना खरंच हसरा आणि नाचरा आहे. त्याच्या प्रत्येक…
-
महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण-२०२५: ₹७०,००० कोटींची गुंतवणूक आणि ‘सर्वांसाठी घर’चे उद्दिष्ट
•
मुंबई: महाराष्ट्र शासनाने २०२५ गृहनिर्माण धोरणानुसार, ‘माझं घर, माझा हक्क’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बुधवारी (आज) एक अध्यादेश जारी केला आहे. या धोरणांतर्गत, पुढील पाच वर्षांत राज्यात ३५ लाख घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे, ज्यासाठी अंदाजे ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यात वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेऊन…
-
आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची
•
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकी मानत पुस्तक – वाचन चळवळ चालवणारे लोभस व्यक्तिमत्त्व सतीश काळसेकर यांचा आज चौथा स्मृतीदिन… पेण येथील कवी,लेखक, कलाकार, चित्रकार, पत्रकार यांनी एकत्र येऊन बांधलेल्या “चित्रकुटिर” मध्ये ते अखेरपर्यंत राहिले. त्या निसर्गरम्य गृहसंकुलाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कारण विविध…
-
विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक, शिक्षकांवर हलगर्जीपणाचा ठपका; अहवाल सादर
•
वाडा: तालुक्यातील सोनाले येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २६ जून रोजी पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या (वेदिका) मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असून, संस्थाचालकांना…
-
अरेरे… डॉ आंबेडकर यांचेही घराणे फुटले
•
महाराष्ट्रात राजकारण दररोज नवीन वळणे घेत आहे… त्या वेगाने घराघरामध्ये संघर्ष सुरू झाला आहे… मग त्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब तरी कसे अपवाद राहील… ? राजकीय जाण, वस्तुस्थितीचे भान आणि निवडणुकीतील मतांच्या प्रमाणाचे ज्ञान हरवलेल्या, मराठी माध्यमांच्या मते, “महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-
मुंबई पालिकेच्या नव्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे दरमहा ₹१२ कोटींची बचत
•
मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी खासगी कंत्राटदारांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमुळे महापालिकेचा प्रति महिना अंदाजे १२ कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केला आहे. या प्रणालीमुळे सुमारे ३५ हजार कामगारांच्या नोकरीवर परिणाम होण्याची चिंता…
-
बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या: दोन पोलिसांसह एजंटला अटक
•
नालासोपारा: नालासोपारा येथे बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान (६१) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चौहान यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, कर्जाच्या वसुलीसाठी दोन पोलीस कर्मचारी मानसिक छळ करत असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी दोन पोलीस हवालदार श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांच्यासह…
-
आमदारांच्या बनावट लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटींचा निधी पळवण्याचा प्रयत्न उघड
•
मुंबई: महाराष्ट्रात आमदारांच्या बनावट लेटरहेड, सह्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या आवाजाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटी १० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस…