Tag: Mahesh Mhatre

  • आमदारांच्या बनावट लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटींचा निधी पळवण्याचा प्रयत्न उघड

    आमदारांच्या बनावट लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटींचा निधी पळवण्याचा प्रयत्न उघड

    मुंबई: महाराष्ट्रात आमदारांच्या बनावट लेटरहेड, सह्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या आवाजाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटी १० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस…

  • ठाकरी भाषा; घोर निराशा

    ठाकरी भाषा; घोर निराशा

    काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. आपला नेताच असे बोलतो म्हंटल्यावर उद्धव सेनेतील अन्य नेतेही मनसे विरोधात बोलू लागले. मग तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. हिंदी सिनेमात येते, तसे अचानक एक भाषिक वळण येते… हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर, दोन्ही ठाकरेंना…

  • गडकरींचे ‘इंटेलिजेंट सिस्टम’ अपघातांना आळा घालणार

    गडकरींचे ‘इंटेलिजेंट सिस्टम’ अपघातांना आळा घालणार

    नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गांवरील अपघातांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. २०१४ पासून ते या दिशेने प्रयत्नशील असून, आता त्यांनी ‘अडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (ATMS) द्वारे महामार्गांचे अत्याधुनिक डिजिटलीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नियम मोडणाऱ्या…

  • अ.भा मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत

    अ.भा मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै रोजी मुंबईत

    मुंबई: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव” पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना तर महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे महेश म्हात्रे यांना आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २ जुलै, २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…

  • पंढरपूरला पुराचा धोका: भीमा आणि नीरा नद्यांना पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

    पंढरपूरला पुराचा धोका: भीमा आणि नीरा नद्यांना पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

    पंढरपूर: उजनी आणि वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता असून, पंढरपूर येथील जुना दगडी पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. प्रशासनाने आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर…

  • रतन टाटांच्या शेअर्सबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: ‘त्या’ दोन संस्थांनाच मिळणार समभाग

    रतन टाटांच्या शेअर्सबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: ‘त्या’ दोन संस्थांनाच मिळणार समभाग

    मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावरील सूचीबद्ध आणि असूचीबद्ध शेअर्सच्या वाटपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्या शेअर्सचा त्यांच्या मृत्युपत्रात स्पष्टपणे उल्लेख नव्हता, ते सर्व शेअर्स रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन (Ratan Tata Endowment Foundation) आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट (Ratan Tata Endowment Trust)…

  • त्रिभाषा सूत्रावर अंतिम निर्णय सर्वसहमतीनेच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    त्रिभाषा सूत्रावर अंतिम निर्णय सर्वसहमतीनेच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) त्रिभाषा सूत्रावरून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत त्रिभाषा सूत्रासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घाईघाईने न घेता, साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि इतर सर्व संबंधितांशी सखोल चर्चा करूनच तो घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले…

  • माळेगाव साखर कारखाना निवडणूक: अजित पवार यांच्या पॅनेलची जोरदार आघाडी

    माळेगाव साखर कारखाना निवडणूक: अजित पवार यांच्या पॅनेलची जोरदार आघाडी

    बारामती : बारामती-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘नीलकंठेश्वर पॅनल’ने जोरदार आघाडी घेतली आहे. विशेषतः सर्वाधिक मतदान असलेल्या ‘ब’ वर्ग गटात नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल दर्शवत आहेत. या निवडणुकीत स्वतः अजित पवार ‘ब’ वर्गातून विक्रमी मतांनी विजयी…

  • लातूरमध्ये महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलची मुजोरी, भरचौकात तरुणींना शिवीगाळ करून मारहाण

    लातूरमध्ये महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलची मुजोरी, भरचौकात तरुणींना शिवीगाळ करून मारहाण

    लातूर : शहरातील रेनापूर नाका परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवून मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

  • धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

    धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

    वाशी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पवनचक्की प्रकल्पासाठी विद्युत लाईन टॉवर टाकण्याच्या कामावरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली. नुकसानभरपाई (मावेजा) मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, तर पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळत, आत्मसंरक्षणासाठी कारवाई केल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांदुळवाडी येथील…