Tag: Mahesh Mhatre
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या गीतादरम्यान अश्रू अनावर
•
देहरादून : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 67 वा वाढदिवस काल, शुक्रवारी उत्तराखंडमधील देहरादून येथे साजरा करण्यात आला. या दोन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर असताना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राष्ट्रीय दृष्टिहीन व्यक्ती सक्षमीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी “बार बार ये दिन आए” हे…
-
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याप्रकरणी महिलेला साडेसात वर्षांची शिक्षा
•
लखनौ: लखनौच्या विशेष न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात, एका २४ वर्षीय महिलेला सामूहिक बलात्कार आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ऍट्रॉसिटी) खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची आणि २.१ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक निर्णयाने खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना कठोर संदेश दिला आहे. प्राप्त माहितीनुसार, रेखा नावाच्या…
-
मिठी नदी गैरव्यवहार: अभिनेता डिनो मोरियाची ईडीकडून पुन्हा चौकशी
•
मुंबई: मिठी नदी गाळ उपसा कंत्राटातील कथित ६५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेता डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांची गुरुवारी (२० जून २०२५) पुन्हा तीन तास चौकशी केली. या प्रकरणातील ही त्यांची दुसरी चौकशी असून, ईडी या प्रकरणी अधिक सखोल तपास करत आहे.हे प्रकरण मिठी नदीतील…
-
तिकीट भाडेवाढ आणि वेळेवर सेवा नसल्याने एसटीला ऐन हंगामात मोठा फटका
•
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन दीड हजार बस ताफ्यात दाखल केल्या असल्या तरी, यंदाच्या एप्रिल ते जून या महत्त्वाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात सरासरी २० लाख रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तिकीट दरातील वाढ, आगारांची अस्वच्छता आणि…
-
भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का: पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील आर्थिक नियंत्रण सरकारकडे
•
मुंबई: भाजपने एक महत्त्वाचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मोठ्या प्रकल्पांचे आर्थिक नियंत्रण स्वतःकडे घेतले आहे. हा निर्णय राज्यातील राजकीय आणि आर्थिक समीकरणात मोठा बदल घडवणारा मानला जात आहे.…
-
रायगडमध्ये पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा
•
रायगड : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.…
-
धाराशिव: पटसंख्या वाढवण्यासाठी दुधाळवाडी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; घरपट्टी आणि पाणीपट्टीतून सूट!
•
कळंब, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या ही सध्या एक मोठी चिंता बनली आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, यावर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुधाळवाडी ग्रामपंचायतीने एक अनोखा आणि प्रेरणादायी उपाय शोधून काढला आहे. त्यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद…
-
अहमदाबाद विमान अपघातस्थळी सापडलेले मौल्यवान ऐवज केले परत, 70 तोळे सोनं आणि…
•
अहमदाबाद: अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर मदतकार्यात धावून गेलेल्या पहिल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या राजेश पटेल यांच्या प्रामाणिकपणाचे एक उल्लेखनीय उदाहरण समोर आले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर पटेल यांनी अपघातस्थळी परत जाऊन तेथे विखुरलेले सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी गोळा केलेला सर्व ऐवज तत्काळ…
-
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाची मोठी झेप, आयआयटी-मुंबईची घसरण
•
मुंबई: नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर स्थान मिळवून लक्षणीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत ७११-७२० वरून ६६४ व्या स्थानावर मजल मारली आहे. दुसरीकडे, आयआयटी-मुंबईची घसरण झाली असून ते देशात दुसऱ्या स्थानी…
-
पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?
•
देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण…