Tag: Samruddhi highway
-
ई-वाहनांना ‘समृद्धी’सह तीन महामार्गांवर ‘टोल’मुक्त प्रवासाची शक्यता
•
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील ई-वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासह, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख महामार्गांवर ई-वाहनांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. ई-वाहनांना टोलमधून सूट देण्याबाबत परिवहन विभागाने चाचपणी सुरू केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या, समृद्धी महामार्गावर हलक्या मोटार वाहनांसाठी प्रति…
-
समृद्धी महामार्गावर ‘१ हजार डोळे’, वेगमर्यादा ओलांडल्यास ऑनलाइन दंड
•
अमरावती: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ५०० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास चालकांना ऑनलाइन दंड आकारला जाणार आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, या कॅमेऱ्यांमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाइन दंड या महामार्गावर…
-
समृद्धी महामार्गाजवळ रस्त्याला नदीचे स्वरूप, वाहतूक दीड तास ठप्प
•
बुलढाणा: समृद्धी महामार्गाच्या मेहकर इंटरचेंजजवळील रस्त्यावर जोरदार पावसामुळे पाणी साचून रस्त्याने अक्षरशः नदीचे रूप धारण केले होते. २६ जून रोजी मेहकर आणि लोणार तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या जलनिस्सारण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक जवळपास दीड तास थांबली…