Tag: Supreme court
-
‘भारत ही धर्मशाळा नाही जिथे जगभरातील निर्वासितांना सामावून घेता येईल…’-सर्वोच्च न्यायालय
•
दिल्ली : भारत ही धर्मशाळा नाही जिथे आपण जगभरातील परदेशी नागरिकांना सामावून घेऊ शकतो, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने आज श्रीलंकेच्या एका नागरिकाची आश्रय याचिका फेटाळून लावली. जगभरातून येणाऱ्या निर्वासितांना भारतात आश्रय देता येईल का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. आपण १४० कोटी लोकांसोबत संघर्ष करत आहोत, न्यायालय म्हणाले. श्रीलंकेत एकेकाळी सक्रिय…
-
“राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा”, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
•
दिल्ली : राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. गैर-सरकारी संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात…
-
शिवसेना कोणाची? या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर
•
दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला आव्हान देत उद्धव सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी जलदगतीने करण्याची विनंती उद्धव सेनेने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केली. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात अधिसूचित कराव्यात आणि…
-
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 4 महिन्यांच्या आत निवडणूका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतच्या निवडणुका यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या आदी होण्याचे चिन्हे आहेत. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
-
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल
•
प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २००४-५ मधील तसेच २००७ या कालावधीतील संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा लोणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह एकूण ५४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
-
राहुल गांधींना सावरकरांवर विधान करणं भोवलं; सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं
•
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल टिपण्णी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नये असे म्हटले आहे. तुम्ही राजकारणी आहात, अशी बेजबाबदार विधाने करू नका.जर असे विधान पुन्हा केले गेले तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडसावले.…
-
पत्नी व मुलांची हत्या, मुलीवर अत्याचार; फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
•
आपल्या पत्नी आणि चार निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत केले आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेतील सजगतेसोबतच दया दाखवण्याच्या अधिकाराचाही उपयोग कसा केला जातो, यावर चर्चेची नवी दालने खुली झाली आहेत. या प्रकरणात आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केले असून,…
-
वक्फ मालमत्तांना अभय; भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाची केंद्राला सात दिवसांची मुदत
•
वक्फ मालमत्तांबाबत निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण घडामोड झाली. केंद्र सरकारने स्पष्ट ग्वाही दिली की, ‘वक्फ बाय यूजर’ मालमत्तांसह कोणतीही वक्फ मालमत्ता सध्या काढून घेतली जाणार नाही, तसेच केंद्रीय वक्फ परिषद किंवा राज्य वक्फ बोर्डांवर ५ मेपूर्वी कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत. याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला…
-
उर्दू भारतीय भाषा, कोणत्याही धर्माशी तिचा संबंध नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
•
उर्दू ही लोकभाषा आहे. ती कोणत्याही धर्माशी जोडलेली नाही आणि मराठीसह तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,” असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपालिकेच्या उर्दू फलकाला विरोध करणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली.भाषिक विविधतेचा आदर राखणे गरजेचे असून, उर्दूसह सर्व भाषांशी मैत्री करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत न्यायमूर्ति…