टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या भारतातील आघाडीच्या आयटी कंपनीविरोधात अमेरिकेत गंभीर आरोपांच्या चौकशीत ती सापडली आहे. अमेरिकेतील समान रोजगार संधी आयोगाने टीसीएसच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या आधारे अधिकृत चौकशी सुरू केली आहे.
टीसीएसविरोधात तक्रार करणारे कंपनीचे माजी कर्मचारी असून, ते बिगर दक्षिण आशियाई पार्श्वभूमी असलेले आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की कंपनीने नोकरकपात करताना खास करून त्यांनाच लक्ष्य केलं, हे भारतीय कर्मचारी एच-१बी व्हिसावर कार्यरत होते, त्यामुळे २०२३ पासून या कर्मचाऱ्यांनी टीसीएसच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
सुमारे दोन डझनांहून अधिक कर्मचाऱ्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्याचे समजते. ही चौकशी जो बायडन यांचं अध्यक्षपद सुरू असतानाच आरंभली गेली होती आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळातही ती सुरू आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार तक्रारी गोपनीय ठेवत असल्याने आयोगाने या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.
ब्रिटनमध्येही टीसीएसवर आरोपांचा गुंता
या प्रकाराच्या तक्रारी फक्त अमेरिकेपुरत्याच मर्यादित नाहीत. ब्रिटनमधील तीन माजी कर्मचाऱ्यांनीही रोजगार न्यायाधिकरणाकडे टीसीएसविरोधात वय व राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भेदभाव केल्याची तक्रार केली होती. २०२३ मध्ये करण्यात आलेल्या नोकरकपातीत हा भेदभाव झाल्याचा आरोप होता. मात्र, टीसीएसने या आरोपांना न्यायाधिकरणासमोर फेटाळले होते.
टीसीएसच्या विरोधातील भेदभावाचे आरोप तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहेत. सर्वांना संधी देण्याचे काम कंपनीने सुरुवातीपासून केले आहे. कंपनीकडून आपल्या कार्यपद्धतीत कायम मूल्यांना स्थान दिले गेले आहे.
Leave a Reply