पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता.आता भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्याच्या जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया दिली आहे, हे जे सिंदूर ऑपरेशन केलं आहे, त्यातून त्यांनी त्या हल्ल्यातील सर्वांना श्रध्दांजली वाहिली आहे. संतोष जगदाळे यांच्या पत्नी यांनी यावर बोलताना म्हणाल्या की, ”त्यांनी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं त्यासाठी मी त्यांची आभारी आहे, मोदींनी आमच्या भावना जाणून घेतल्या. आमच्या समोरच आमचं कुंकू त्या दहशतवाद्यांनी पुसलं. गोळ्या घालून त्यांनी माझ्या नवऱ्याला मारलं. आज पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला आहे, तो अतिशय योग्य आहे. हा धडा त्यांना देणं गरजेचं होतं. मला खात्री होती, आम्ही मोदींच्या मुली आहोत, ते त्यांच्या मुलींना समजून घेतील अशी खात्री होती. याआधी झालेले उरी हल्ला झाला होता, त्यातून त्यांनी असं दाखवून दिलं होतं आम्ही करू शकतो. आताही मला खात्री होती, थोड वेळ घेतील पण ते हल्ला करतील, असंही संतोष जगदाळेंच्या बायकोने म्हटलं आहे.
आसावरी जगदाळेने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांना सरकारकडून श्रध्दांजली मिळाली असं वाटतं आहे. पंधरा दिवसात मिशन पूर्ण केलं. मी सरकारचे आभार मानते, जे 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रध्दांजली मिळाली आहे, असंही आसावरी म्हणाली. जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामधील 6 जण महाराष्ट्रातील होते, दरम्यान भारताने केलेल्या या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर हल्ल्यात पुण्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे
Leave a Reply