मुंबई | दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त वाकेश्वर येथील प्रसिद्ध ‘बाणगंगेची महाआरती’ मोठ्या उत्साहात पार पडते. यंदाही बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांची वर्षागणिक वाढणारी गर्दी लक्षात घेता, जी. एस. बी. टेम्पल ट्रस्टने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ट्रस्टने या वर्षीच्या महाआरतीसाठी तब्बल ₹२४९ कोटींचा विमा उतरवला आहे. हा निर्णय गर्दीच्या प्रमाणाचा अंदाज घेत सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी घेण्यात आला आहे.
ट्रस्टने यंदा भाविकांच्या ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था केली असून, त्याला भाविकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण कार्यक्रम सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडावा यासाठी जी. एस. बी. टेम्पल ट्रस्टने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या पारंपरिक महाआरतीच्या माध्यमातून दरवर्षी हजारो भाविक बाणगंगा घाटावर एकत्र येतात, आणि या वर्षीची आयोजन व्यवस्था आणि विमा कवच पाहता, महाआरती अधिक भव्य आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply