होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवा; नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

होर्डिंग्जच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्धिष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धा निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात, आशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्या आहेत. होर्डिंग महामंडळाने स्वतः उभारावीत, त्यावरील जाहिरातीचे हक्कविक्री करावी. अशा पद्धतीने महसूलवाढीसाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना राणे म्हणाले, सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी, तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण
तयार करावे अशा सूचना नितेश राणे यांनी बुधवारी दिल्या. होडिंगच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूल संकलनाचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

महामंडळाच्या जागांचे व्यावसायिक वापराचेही
धोरण नियमन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व जागा भाडेतत्त्वावर देताना स्पर्धात्मकता आणण्याच्या दृष्टीने निविदा मागवण्याची कार्यवाही करावी. अनेक वर्ष एकाच जागी व्यवसाय केला जातो.परंतु नियमानुसार भाडेअदा केले जात नाही अशा प्रकरणी संधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,’ अशा सूचनाही राणे यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात सागरी महामंडळाच्या जागांच्या व्यावसायिक वापराविषयी धोरण ठरवण्याबाबत बुधवारी बैठक झाली. सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह महामंडळाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सागरी महामंडळांच्या मुंबई महानगरक्षेत्रातील जागांवर होर्डिंग उभारण्यासाठी धोरण राबवताना त्यातून जास्तीत जास्त महसूल निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत असे राणे म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *