छ. संभाजीनगर : अलीकडेच, इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीदरम्यान VBA सोबतची युती का तुटली यावर स्पष्टपणे भाष्य केले. त्यांच्या मते, वंचित घटकांना एकत्रित न्याय देण्याच्या प्रयत्नात ना घरचे राहिले ना घाटाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘दूध जाळले कोणी?’ असा सवाल केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत आणि दोन्ही पक्षांमधील संबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया पेजवरून इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधत पोलखोल सुरू आहे. दिवसभरात वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरून दोन पोस्ट करण्यात आले ज्यामध्ये इम्तियाज जलील यांच्यावर मोठे आरोप करण्यात आले आहेत.
जलील यांना प्रत्युत्तर देत लिहलय की, इम्तियाज जलील तुमची मुलाखत पाहिली ज्यामध्ये तुम्ही आमच्यावर आरोप करत विचारतायेत की, दूध कोणी जाळले.? तुमच्या बदललेल्या वर्तणुकीने आणि निवडणुकीत जिंकल्यानंतर तुमच्या आलेल्या गर्वाने दूध जाळले. अमच्यासोबत तुम्ही केलेली गैरवर्तणुक ओवेसी यांना कळाली तर कदाचित ते तुम्हाला पदावरून सुद्धा काढून टाकतील. तुमची अजून पोल खोलायची का? तुम्ही 2019 मध्ये अंबादास दानवे सोबत डील करून त्यांना विधानपरिषद निवडणुकीत जिंकवलं. स्वतःच्या पक्षाचे उमेदवार अब्दुल गफ्फार कादरी यांच्या विरोधात काम करून त्यांना पराभूत केलं. जो स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला हरवू शकतो तर तो आमच्यासोबत युतीत विश्वासू कसा राहील, असे प्रश्न उपस्थित करत जलील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
इतकंच नाही तर काही तासानंतर आणखी एक पोस्ट करण्यात आलीय, ज्यात लिहलय की, ” इम्तियाज जलील, ऐकण्यात आलंय की हल्ली फडणवीस यांचे तुम्हाला खूप फोन येतायत. संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला संपवून भाजपला जागा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलंय. असदुद्दीन ओवेसी आणि तुमच्या कार्यकर्त्यांना हे माहिती आहे का?” असा सवाल करत मोठा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे.
आता ही पोलखोल कुठपर्यंत चालू राहील की अंधारात हातमिळवणी होईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण जर वंचीतच्या आरोपात तथ्य असल्यास मुस्लिमांचे नेते म्हणून मिरवणारे इम्तियाज जलील हे सध्या आरोपीच्या कटघऱ्यात आहेत.
Leave a Reply