नवी मुंबईजवळ तिसरी मुंबई स्थापन करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र सरकारनेही या आराखड्याचे काम सुरू केले आहे. २०२५ मध्ये तिसरी मुंबई स्थापन करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाईल. हे काम वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. सर्वेक्षणाअंतर्गत प्रस्तावित तिसऱ्या मुंबईत किती गावे आहेत, गावांचा आकार, गावांची लोकसंख्या, रस्ते, रुग्णालये, शाळा, मोकळी मैदाने, तेथे कोणत्या प्रकारची बांधकामे झाली आणि इतर सर्व बाबींचा अहवाल तयार केला जाणार आहे.
ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पाडली जाईल, जेणेकरून अचूक माहिती संकलित करता येईल. यादरम्यान कोणत्या जमिनीवर कोणाचे मालकी हक्क आहेत, याचाही डेटा तयार केला जाईल. पाहणी अहवालाच्या आधारे तिसऱ्या मुंबईचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे.
डेटा सेंटर हब म्हणून विकसित करण्याची योजना
मुंबईला देशातील तिसरे डेटा सेंटर हब म्हणून विकसित करण्याची योजना सरकारने आखली आहे. देशातील ६५ टक्के डेटा साठवण्यासाठी पायाभूत सुविधा येथे तयार केल्या जातील.
विशेष म्हणजे मुंबईत जागेची तीव्र टंचाई आहे. त्याचबरोबर अटल सेतूच्या उभारणीमुळे मुंबईहून नवी मुंबई गाठणे अगदी सोपे झाले आहे. रायगड जिल्ह्यात जिथे अटल सेतू संपतो त्या संकुलात मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. अशा स्थितीत पुलाजवळील विकासाला प्रचंड वाव आहे. या कारणास्तव सरकारने तेथे तिसरी मुंबई स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत बांधण्यात आलेले नवीन विमानतळही लौकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नुकतेच तेथे पाहिले विमान उतरले होते. त्यामुळे या परिसरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. फक्त या सर्व प्रक्रियेत स्थानिकांचा विकास महत्त्वाचा मानला जावा. हिच अपेक्षा
Leave a Reply