लग्नाचे स्वप्न उराशी बाळगून आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी सज्ज असलेल्या २४ वर्षीय प्रियांकाच्या आयुष्याचा धक्का बसवणाऱ्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. दिल्लीच्या कपाशेरा येथील फन अँड फूड वॉटर पार्कमध्ये रोलरकोस्टर राइडचा आधार स्टँड कोसळल्यानं प्रियांका थेट उंचावरून खाली कोसळली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली. आपल्या होणाऱ्या पतीसोबत तरुणी वॉटर पार्कमध्ये आली होती, पण रोलर कोस्टर राईड तुटली आणि होत्याचं नव्हतं झालं.. एकत्र आनंद घेत असतानाच त्यांच्या आयुष्यात काळाकुट्ट वळण आलं. रोलरकोस्टरचा तांत्रिक बिघाड झाला आणि काही क्षणातच प्रियांका उंचीवरून खाली कोसळली. निखिलने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण प्रियांकाला वाचवता आलं नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये प्रियांका आणि निखिलचं लग्न ठरलेलं होतं. नोएडामधील एका खासगी टेलिकॉम कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणारी प्रियांका घरासाठी आधार बनण्याचं स्वप्न पाहत होती. कुटुंबीयांनी सांगितलं की, ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन घराला हातभार लावण्याची इच्छाशक्ती बाळगत होती.
या प्रकरणी, भारतीय न्याय संहितेच्या कलम २८९अंतर्गत प्राणी वा यंत्रसामग्रीबाबत निष्काळजी व कलम १०६अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a Reply