कला क्षेत्रातील दोन ‘ऋषितुल्य’ व्यक्तिमत्त्व पद्मभूषण राजदत्त आणि पद्मश्री कामत यांचा होणार सन्मान

मुंबई: चित्रपट आणि चित्रकला क्षेत्रातील दोन प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व, पद्मभूषण श्री. राजदत्त आणि पद्मश्री श्री. वासुदेव कामत, यांच्या सन्मानार्थ संस्कार भारती, कोकण प्रांत यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा पार पडेल.’अभ्यासोनि प्रकटावे’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात, चतुरंग प्रतिष्ठानचे श्री. विद्याधर निमकर हे दोन्ही मान्यवरांशी संवाद साधतील. या प्रसंगी ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि स्वतः उत्तम चित्रकार असलेल्या आदरणीय उषाताई मंगेशकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण श्री. राजदत्त यांनी “देवकी नंदन गोपाला”, “शापित”, “अष्टविनायक”, “सर्जा”, “पुढचं पाऊल” अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.दुसरीकडे, पद्मश्री श्री. वासुदेव कामत सर हे एक प्रख्यात चित्रकार आहेत. त्यांची चित्रे अयोध्या येथील राममंदिर, जपानमधील बुद्धमंदिर, विविध ठिकाणचे स्वामीनारायण मंदिर, अक्षरधाम मंदिर आणि ऑल इंडिया आर्ट लंडन यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ठिकाणी प्रदर्शित आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही मान्यवरांनी यापूर्वी संस्कारभारतीचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले आहे. या कार्यक्रमात दोन्ही कलाकारांनी घडवलेल्या चित्रपट आणि चित्रकला क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित राहून त्यांचा सन्मान करतील.

प्रवेश विनामूल्य आहे, परंतु सर्वांसाठी नोंदणी (पंजीकरण) अनिवार्य आहे. आपण खालील लिंकवर नोंदणी करू शकता:
नोंदणी लिंक: https://forms.gle/XLmFn3iCs4j6Lmvz7
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्कार भारती, कोकण प्रांताचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अभिनेता व निर्माता सुनील बर्वे आणि कार्याध्यक्ष मुकुंद मराठे हे कार्यरत आहेत.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क:
* श्रीहरी कुलकर्णी: ९६१९१ ९१९८३
* संकेत शिंगोटे: ८६९१० ६८९७६
संस्कार भारती, कोकण प्रांत, समस्त कलाप्रेमींना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *