वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादल्याने आता अमेरिकेत भारतीय वस्तूंवर एकूण ५०% टॅरिफ लागू झाले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे हा दंड लावण्यात आल्याचे ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. हे टॅरिफ ‘अन्यायकारक, अनुचित आणि अवाजवी’ असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ‘देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील’. भारताची तेल आयात ही बाजारातील परिस्थिती आणि १४० कोटी भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी केली जाते, असेही स्पष्ट करण्यात आले. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात २५% टॅरिफची घोषणा केली होती, जे ७ ऑगस्टपासून लागू झाले. त्यानंतर आता अतिरिक्त २५% शुल्क लागू झाल्यामुळे एकूण टॅरिफ ५०% झाले आहे.
भारतावर होणारे परिणाम
अमेरिकेने लादलेल्या या टॅरिफमुळे भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कापड, तयार कपडे, रत्ने, दागिने, अभियांत्रिकी वस्तू, ऑटो पार्ट्स, मसाले आणि कृषी उत्पादनांच्या मागणीवर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. मागणी घटल्यास निर्यातीवर परिणाम होऊन कंपन्यांतील लाखो नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
इतर देशांवरील टॅरिफची स्थिती
कॅनडा: ३५%
ब्रिटन: ४०%
चीन: ३०%
जपान: १५%
ब्राझील: १५%
जर्मनी: २०%
फ्रान्स: २०%
राजकीय प्रतिक्रिया
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याला ‘आर्थिक ब्लॅकमेल’ म्हटले असून हे भारताला अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकावणारे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
आरबीआयचे उत्तर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर टीका करताना तिला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटले होते. यावर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी उत्तर दिले की, आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत १८% योगदान देत आहोत, तर अमेरिकेचे योगदान केवळ ११% आहे. भारतीय अर्थव्यवस्था उत्तम काम करत आहे आणि पुढेही करत राहील, असे त्यांनी सांगितले.
Leave a Reply