वाटचाल शतकं महोत्सवी वाढदिवसा कडे…

श्रीधर गोविंद कामेरकर
२४फेब्रुवारी १९२८
वय : ९६ वर्षे

वयाच्या १६ व्या वर्षी ६ महिने चालत,बैलगाडी, बस असा प्रवास करीत मुंबईत पदार्पण.
मुंबईत मिळेल ती नोकरी आणि फूटपाथपासून दुकानाच्या माळ्यापर्यंत मिळेल तिथे रात्रीची पथारी अशी ३वर्षे काढली. नंतर डिलाईल रोड ला हक्काचे विडी दुकान मिळाले. तिथून व्यापाराला सुरुवात. मग कधी घाऊक विडी -तंबाखू चा व्यापार, तर कधी चुनापुडी चा उद्योग, असे विविध व्यापार उद्योग करीत पूर्ण एकत्रित कुटुंबाला मुंबईत आणून त्यांची व्यवस्था करून स्वतःच्या कुटुंबाला ही स्थिरता आणली. १९८० साली औषधाचे दुकान सुरु केले. मुलगा विजय यालाही व्यवसायात आणले. १९९२ साली दुसरे औषध दुकान, १९९६ ते २००२ पर्यंत गावी रत्नागिरीला २२एकर जमीन घेऊन हापूस आंबा लागवड केली. २००० साली घाऊक औषध व्यवसाय गुजराथी कुटुंबाकडून घेतला, वाढवला.
आज वयाच्या ९७ व्या वर्षी सुद्धा इंग्रजीचा गंध ही नसताना शेअर्सची उलाढाल करतात.

वाटचाल शतकं महोत्सवी वाढदिवसा कडे…
असंख्य अडचणींवर मात करीत , जिवनाची यशस्वी पताका अटकेपार फडकविणारे माझे गुरू, पितृतुल्य आदरणीय श्रीधर (भाई) कामेरकर यांना ९७व्या *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐

डॉ. संतोष कामेरकर
अध्यक्ष- वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट
संचालक- वैश्य सहकारी बँक लि., मुंबई

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *