पुणे : लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्यावतीने शनिवारी 31 मे रोजी सकाळी 10.30 वाजता पुण्यातील महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार सोहळा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करत असलेल्या समाज भूषण व्यक्तींचा “वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार” देऊन सन्मान केला जाणार आहे. यात खासदार डॉ. अमित गोपछडे, माजी मंत्री दिलीप सोपल, पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
ज्ञान सिंहसनाधिश्वर १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य काशी महास्वामीजी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण केलं जाणार आहे. वीरशैव लिंगायत दीपस्तंभ स्मृती गौरव पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये खा.डॉ.शिवाजी काळगे, माजी मंत्री बसवराज पाटील, विजयकुमार देशमुख, विनयजी कोरे, सिद्धराम म्हेत्रे, आ. हरीष पिंपळे, आ सचिन कल्याणशेट्टी, आ. प्रवीण स्वामी, उपमुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे, डॉ. ओमप्रकाश शेटे, सुहाया मापारी, सरिता नरके, अनिल गाडवे आदी मान्यवरांचा समावेश आहे. या कार्यक्रमात काकासाहेब कोयटे ,अध्यक्ष श्री सुनिल रुकारी, सरलाताई पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे. लिंगायत संघर्ष समितीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष संतोष शशिकांत जिरेसाळ यांनी सर्व लिंगायत समाज बांधवांसह या गौरव समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.


Leave a Reply