मुंबई — प्रख्यात कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विंदा करंदीकर स्मृती व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यंदा “भारतीय काव्यशास्त्रातील गोपन आणि शोधन” या विषयावर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हजारिमल सोमनाणी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि श्रीमती कुसुमताई चौधरी कला महाविद्यालय (स्वायत्त), बांद्रे (पूर्व), मुंबई यांच्या वतीने, विंदा करंदीकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
या व्याख्यानासाठी ज्येष्ठ गुजराती कवी आणि नाटककार प्रा. सीतांशु यशश्चंद्र हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय काव्यशास्त्रातील सखोल चिंतन, तत्त्वज्ञान आणि कवितेतील सूक्ष्मता यावर ते प्रकाश टाकणार असून, साहित्यरसिकांसाठी ही एक बौद्धिक मेजवानी ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. ठिकाण — लोकसेवक मधुकरराव चौधरी सभागृह, चेतना शिक्षण संस्था, शासकीय वसाहत, बांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१.
या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, सर्व विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विंदा करंदीकर यांच्या काव्यपरंपरेचा वारसा जपत, या व्याख्यानातून भारतीय साहित्यपरंपरेचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे.


Leave a Reply