राज्यात पाणीटंचाई भेडसावत आहेत. कारण
राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तब्बल ३ हजार १५ गावं, वाड्यांची तहान टँकर्सने भागवली जात आहे. तसेच तापमानामुळे पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचं संकट राज्यात घोंगवत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची संख्या ही सर्वांनाच धक्का देणारी ठरत आहे. राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पांमध्ये एकूण ४० हजार ४९८ दशलक्षघनमीटर जलसाठा क्षमता असून सद्या ३३.७१ टक्केवारीने १३ हजार ६५३ दशलक्षघनमीटर उपयुक्त साठा उरला आहे.
जलसाठ्याची सद्यस्थिती
कोकण विभाग : ४१.४२ टक्के
मराठवाडा विभाग : ३३.३३ टक्के
नागपूर विभाग : ३५.८९ टक्के
अमरावती विभाग: ४३.८२ टक्के
नाशिक विभाग: ३७.७९ टक्के
पुणे विभाग : २७.२६ टक्के
२०२४ मध्ये हा पाणीसाठा याच कालावधीत २९.८६ टक्के होता. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २३० गावांत व ४४ वाड्यांत पाणीटंचाई असून ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात २१० गावे व ७४५ वाड्यांमध्ये २१८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागात १६७ गावे व १ हजार १२५ वाड्यांमध्ये १७२ टँकरने तर ठाणे व कोकण विभागात ७२ गावे व ३४३ वाड्यांत १०५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तूर्त पाण्याच्या भीषण टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत नसले तरी सध्या राज्यातील काही धरणे तळाशी जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय अनेक धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत, तर बोअरवेलची पाणीपातळी खोल जाऊ लागली आहे.
Leave a Reply