नवी दिल्ली : विधवा महिलेला तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे विधवा महिलांच्या आर्थिक हक्कांबाबतचा एक महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट झाला आहे. न्यायमूर्ती अनिल क्षेत्रपाल आणि न्यायमूर्ती हरिश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, जर सासऱ्यांकडे स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेली मालमत्ता असेल तर ती वडिलोपार्जित ठरत नाही. मात्र, सूनबाईला वारस म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेतून भरणपोषणाचा दावा करण्याचा अधिकार मिळतो.
न्यायालयाचे निरीक्षण
हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा कलम १९(१) नुसार विधवा महिलेला सासऱ्याकडून भरणपोषण मागण्याचा हक्क आहे. मात्र हा हक्क फक्त वडिलोपार्जित मालमत्तेसाठी लागू असून, सासऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून असा भत्ता मागता येणार नाही. जर सासऱ्यांकडे पैतृक मालमत्ता नसल्यास विधवा सूनबाईकडे भरणपोषण मागण्यासाठी कोणतेही कायदेशीर अधिष्ठान उरणार नाही. या खटल्यात कर्नाटक न्यायालयाचा ‘विधवा महिलेला भरणपोषणाचा हक्क नाही’ असा पूर्वीचा निकाल रद्दबातल ठरवण्यात आला आहे. संबंधित महिला मार्च २०२३ मध्ये पतीच्या मृत्यूनंतर सासऱ्यांवर दावा दाखल केला होता, तर सासऱ्यांचे निधन जानेवारी २०२४ मध्ये झाले. या निर्णयामुळे विधवा महिलांच्या हक्कांना नवे बळ मिळाले असून, वारसाहक्क आणि भरणपोषणाच्या कायद्यातील स्पष्टता निर्माण झाली आहे.
Leave a Reply