उरण येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर अत्याधुनिक ई-स्पीड बोटसेवा १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. ही सेवा सुरू होण्यास मागील सहा महिन्यांपासून विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
प्रवासी संख्या घटल्याने खर्चाचा प्रश्न
उरण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळे जेएनपीएला ई-बोटसेवेचा खर्च परवडत नाही. जुन्या लाकडी बोटी खर्चीक व सुरक्षित नसल्याने जेएनपीएच्या अध्यक्षांनी पर्यावरणास अनुकूल असलेल्या इलेक्ट्रिक अत्याधुनिक ई-स्पीड बोटींचा पर्याय निवडला.
३९ कोटींचा खर्च
माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला १० वर्षांच्या कालावधीसाठी दोन फायबरच्या हलक्या ई-स्पीड बोटी पुरवण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी जेएनपीएने ३० कोटी १० लाख ९९० रुपयांची तरतूद केली आहे. उन्हाळ्यात २० ते २५ आणि पावसाळ्यात १० ते १२ प्रवासी क्षमता असलेल्या या स्पीडबोटी फेब्रुवारीपासूनच दाखल होणार होत्या, मात्र वेग, क्षमता आणि तांत्रिक अडचणींमुळे सेवेला विलंब होत आहे.
पुन्हा चाचणी घेणार
चार्जिंग प्रणालीत सुधारणा करण्याचे काम एका कंपनीकडे सोपविण्यात आले होते. ई-स्पीड बोटींचा चार्जिंगचाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास १५ ऑगस्टपासून प्रवासी वाहतूक सुरू होईल. तांत्रिक अडचणी आल्यास १ सप्टेंबर रोजी ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीचे ‘पंचाआर’ नीरज यांनी दिली.
Leave a Reply