आता भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही खैर नाही, असंच म्हणावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व्हिसदरम्यान संपत्ती कितो वाढली, हे तपासणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले आमच्या सरकारमध्ये पैसे घेऊन काम करणे असे चालणार नाही. राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांना अँटी करप्शन ब्युरो शोधत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्याची नोकरीला लागताना संपत्ती किती होती आणि आता किती आहे, याची चौकशी केली जाणार असल्याचे महसूलमंत्री म्हणाले.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये 5 ते 20 वर्षांपासून काही भ्रष्टाचारी लोक बसले आहेत. त्यांचा मी शोध घेणार आहे. अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासारखा भ्रष्टाचाराच्या आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही शोधून काढणार आहे. आता त्यांना निलंबित करण्यात आले असून पुढील कालावधीमध्ये त्यांना बडतर्फ देखील करण्याची कारवाई करण्यात येईल. आमच्या सरकारच्या काळामध्ये मोजणीसाठी, मुद्रांक नोंदणीसाठी पैसे घेणे, हे चालू दिले जाणार नाही.
राज्यामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. ज्यांना आमचं सरकार आणि अँटी करप्शन ब्युरो शोधत आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्या प्रत्येकाचा शोध घेतला जाणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांची नोकरीवर असताना त्यांची संपत्ती किती होती आणि आता किती आहे, यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.राजकारणामध्ये असलेल्या आम्हा सर्वांना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रॉपर्टीचं विवरण द्यावं लागतं. त्यामुळे प्रशासनातील छोट्या पदावरती राहून कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली आहे, विविध शहरात त्यांची प्रॉपर्टी आहे, अशांचा तपास करून त्या सगळ्यांना शोधून काढणार आहोत. आमच्या महसूल विभागात असे अधिकारी आहेत, त्यांना देखील मी शोधून काढणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
Leave a Reply