1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. इतकंच नाही तर बॅलन्स तपासल्यावर देखील शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे.
कसं आकारले जाणार शुल्क?
१ मे २०२५ पासून, एका विशिष्ट मर्यादेनंतर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वी १७ रुपये शुल्क आकारले जात होते, आता ते १९ रुपये असेल. तसेच, बॅलन्स तपासण्याचे शुल्क देखील ७ रुपयांवरून ९ रुपये करण्यात आले आहे. बँक आपल्या ग्राहकांना मेट्रो शहरात इतर एटीएममध्ये दरमहा ५ मोफत व्यवहार आणि बिगर महानगरांमध्ये ३ मोफत व्यवहारांची मर्यादा देते. याशिवाय, व्यवहारांवर हा वाढीव शुल्क आकारला जाईल.
एटीएमचे शुल्क वाढणार
एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांनी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केल्यानंतर एटीएम शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एटीएम मशीनचा देखभालीचा आणि ऑपरेशनचा खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढला होता. अशा परिस्थितीत, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही मागणी रिझर्व्ह बँकेसमोर ठेवली होती. ज्याला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे.
Leave a Reply