छ. संभाजी नगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमक्या देत छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने सिद्धांतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले असून त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे विवाहित महिलेने या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहेत. दरम्यान, लग्नच नाही तर सिद्धांत यांच्यासोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली होती. मात्र, त्यांनी जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला, असंही विवाहित महिलेने म्हटलं आहे.
ब्लॅकमेल करून लग्न
संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये सोशल मीडियाद्वारे तिची सिद्धांतशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी चेंबूरमधील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने आरोप केला आहे की सिद्धांतने तिला वारंवार आत्महत्येची धमकी दिली आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल केले आणि लग्नासाठी दबाव आणला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनांना बळी पडून तिने त्याच्याशी लग्न केले आणि नंतर ती गर्भवती राहिली. पण सिद्धांतने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. संजय शिरसाट मंत्री असल्याने आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आलाय. सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत ठोंबर यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.
Leave a Reply