मुंबई: यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीने रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार – २०२५’ वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजसेवा, पत्रकारिता, उद्योग आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याची वेगळी छाप पाडणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याच कार्यक्रमात, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या ‘स्वतंत्र संचालक’ पदी भरत नाना पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, ‘महाराष्ट्र रिसर्च सेंटर’चे महेश म्हात्रे, शिवसेनेच्या महिला नेत्या सौ. रंजना शित्रे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. कविता कचरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत चाळके, प्रमोद देशमाने, सुभाष बावडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांच्या कुशल नियोजनामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला आणि त्याला एक वेगळीच उंची मिळाली. या पुरस्कार सोहळ्याने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला योग्य तो सन्मान दिला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Leave a Reply