सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची जोरदार चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आदिमानवाच्या लूकमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. वाढलेले केस, लांबसडक दाढी आणि फाटलेले कपडे अशा हटके अंदाजात तो दिसल्याने चाहते चक्रावले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस आदिमानवासारखा पोशाख घातलेला, लांब केस आणि लांब दाढी असलेला मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून तो कोण आहे? हे ओळखणंही कठीण झालं आहे. हा माणूस बग्गी ओढतानाही दिसतो आणि लोक त्याला एक सामान्य माणूस समजून दुर्लक्ष करताना दिसतात. परंतु तो एक बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.
हा सुपरस्टार 1800 कोटींचा मालक आहे. त्याच्या एका चित्रपटाने तर जगभरात 2000 कोटी रूपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर भरला होता. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा असते. हा अभिनेता कोण असा प्रश्न पडल्यास अनेकांनी अक्षय कुमार, गायक बादशहा अशीही उत्तर दिली होती. त्यातूनही हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चक्क आमिर खान. ज्याला बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट संबोधले जाते. यावेळी त्याचा ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडीओही समोर आला आहे. आमिर खान या लूकसाठी तयार होताना व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर हे उघड झाले. या छायाचित्रांमध्ये आमिर खान केसांचा विग आणि दाढी घातलेला दिसत होता. आमिरच्या व्हायरल व्हिडिओवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, सुपरस्टार ‘भिकारी’ बनण्यामागचं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही.
अभिनेता आमिर खान बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण त्यांच्या संपत्तीत याचा परिणाम झालेली नाही. कारण त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चित्रपटांची निर्मिती होत असून ते बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात यशस्वी ठरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची मालमत्ता 1800 कोटींच्या आसपास आहे.

१८०० कोटींचा सुपरस्टार की रस्त्यावरचा आदिमानव? आमिर खानचा लूक पाहून चाहते थक्क!
•
Please follow and like us:
Leave a Reply