बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी काही महत्त्वाचे पुरावे सादर केले असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत किंवा चौकशी थेट मुंडेंवर केंद्रित झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांचा राजीनामा का घ्यायचा? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
“सिंचन गैरव्यवहारप्रकरणी मी राजीनामा दिला होता”
मात्र, याचवेळी सिंचन गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे मी व्यथित झालो आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्काळ राजीनामा दिला होता, असे सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचा निर्णय मुंडेंच्या कोर्टात टाकला.
“आम्ही कोणालाही वाचवत नाही” – अजित पवार
रविवारी (ता. १६) नाशिकमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला.या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, बीड येथील घटना निर्दयी आहे आणि असे काही घडू शकते, हे सहनही होत नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि महायुती सरकार कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. जनतेने आम्हाला २३७ आमदार निवडून दिले आहेत, ते लोकांसाठी काम करण्यासाठीच.”
अजित पवारांना विचारण्यात आले की, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा का दिला जात नाही? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “मी ३४ वर्षे विविध खाती सांभाळली, स्वच्छ कारभार केला. तरीही सिंचन गैरव्यवहाराच्या आरोपांनी मला लक्ष्य केले गेले. मी सर्व निर्णय सचिवांकडून माहिती घेऊनच घेत असतो, तरीही माझ्यावर आरोप झाले. त्यामुळे मी व्यथित झालो आणि नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.”“पूर्वी लालबहादूर शास्त्री, आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर अनेक गंभीर घटना घडल्या, पण कुणी राजीनामा दिल्याचे मला आठवत नाही.”
आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्या भेटीत काय चर्चा झाली? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले,
“त्या दोघांची भेट झाली, हे मला दोन-तीन दिवसांनी समजले. मात्र, त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.”

“आरोप होताच मी राजीनामा दिला होता” – अजित पवार
•
Please follow and like us:
Leave a Reply