लव्ह जिहाद आणि व्होट जिहादनंतर आता मुंबईत ‘सोसायटी जिहाद’ सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. काही मुस्लिम बिल्डर हा कट रचत असल्याचा दावा करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
काय आहे आरोप?
संजय निरुपम यांच्या मते, ‘सोसायटी जिहाद’ हा एक अतिशय धोकादायक ट्रेंड आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली काही मुस्लिम बिल्डर्स अनधिकृत आणि बोगस पद्धतीने प्रकल्प विकसित करत आहेत. हे बिल्डर्स नव्या स्ट्रक्चरमध्ये मुस्लिम कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर वसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.“मी दोन प्रकरणे उघडकीस आणली आहेत. एका पॅरेडाईज प्रकल्पात मूळ 45 घरे होती, पण पुनर्विकासानंतर ती संख्या 95 वर पोहोचली. विशेष म्हणजे, त्यातील 30 घरे एका मुस्लिम कुटुंबाला देण्यात आली. एसआरएमध्ये एका व्यक्तीला केवळ एकच घर दिले जाऊ शकते, मग एवढी मोठी वाटणी कशी झाली?”असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “ही घरे केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून, ती दुसऱ्या मुस्लिमांना देण्याचा डाव आखला जात आहे. उदाहरणार्थ, श्रीशंकर सोसायटीमध्ये पूर्वी 67 घरे होती, त्यात 60 हिंदू आणि 7 मुस्लिम कुटुंबे होती. आता ती संख्याच 123 वर गेली असून, नवीन रहिवाशांमध्ये मुस्लिमांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे,” असा दावा निरुपम यांनी केला.
निरुपम यांच्या मते, हा प्रकार काही मुस्लिम बिल्डर्स मोठ्या प्रमाणावर करत असून, त्यामुळे मुंबईचा सामाजिक चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भातच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून, संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.
मुंबईतील जोगेश्वरी, ओशिवरा, कुर्ला, मानखुर्द, सायन-कोळीवाडा, वांद्रे, मलाड यांसारख्या भागांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे निरुपम यांनी सांगितले. तसेच, काही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बिल्डर्सकडून पैसे घेऊन या प्रकल्पांना परवानगी दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईत सुरू असलेला ‘सोसायटी जिहाद’ नेमका काय आहे? शिवसेना नेत्याने उघड केलं धक्कादायक सत्य
•
Please follow and like us:
Leave a Reply