केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर असून, विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असले तरी, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
• सकाळी ११ वाजता: कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीनमध्ये पश्चिम विभागीय परिषद बैठक होणार आहे. यात गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली व दिव-दमनमधील सुरक्षा विषयक चर्चा होणार आहे.
• दुपारी ३ वाजता: जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव समारंभास उपस्थित राहणार. हा कार्यक्रम हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात पार पडणार आहे.
• सायंकाळी ५ वाजता: बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि निधी वाटप सोहळा अमित शाह यांच्या हस्ते पार पडणार आहे.
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती नेमकी का? यावरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागे कोणतेही राजकीय संकेत आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दौऱ्यात महत्वाच्या सुरक्षा आणि विकास प्रकल्पांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याने अमित शाह यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे वेगवेगळ्या चर्चांना आणखी जोर येणार आहे.
Leave a Reply