वजन नियंत्रण मोहिमेत दहा मान्यवरांचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रेरित केलं आहे. त्यांनी आहारात बदल करण्याचं आवाहन करत खाद्यतेलाचा वापर १०% टक्क्यांनी कमी करण्याचा संदेश दिला आहे. या मोहिमेचा व्यापक प्रसार करण्यासाठी त्यांनी दहा प्रतिष्ठित व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे.
ही आहेत मोदींनी निवडलेल्या दहा मान्यवरांची नावे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, महिंद्रा उद्योगसमूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा, सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल आणि आर. माधवन, ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, खासदार व लेखिका सुधा मूर्ती, भोजपुरी अभिनेते आणि गायक निरहुआ, ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन निलेकणी

मोहिमेचा उद्देश काय?
पंतप्रधान मोदींनी २३ तारखेला ‘मन की बात’ कार्यक्रमात वाढत्या स्थूलतेबद्दल चिंता व्यक्त केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, २०२२ मध्ये तब्बल २५० कोटी लोक वजनवाढीच्या समस्येने ग्रस्त होते. वजन नियंत्रणासाठी आहारातील तेलाचे प्रमाण १०% टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहन करण्यात आलं. या मोहिमेत सहभागी झालेल्या दहा मान्यवरांनी आपल्या ओळखीतील आणखी दहा लोकांना प्रेरित करावं, अशी सूचना मोदींनी केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *