पक्षबांधणीसाठी ठाकरे गटाचा ठाण्यात शक्तिप्रदर्शन

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षातील फूट रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याने या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आता खुद्द ठाकरे गटाचे नेते ठाण्यात येणार आहेत. २ मार्चला ठाण्यातून पक्षबांधणी मोहीम सुरू केली जाणार असून, ९ मार्च रोजी उद्धव ठाकरे स्वतः मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांसाठी विशेष शिबिर घेणार आहेत.
ठाकरे गटाचे प्रमुख नेते, उपनेते आणि विभागप्रमुख यांची बैठकीची मालिका मातोश्री आणि शिवसेना भवन येथे सुरू आहे. आगामी निवडणुकांसाठी गटबांधणी मजबूत करण्याचा निर्धार घेत, राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने विशेष रणनीती आखली जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांना जिल्हानिहाय दौऱ्यांचे आदेश देण्यात आले आहेत.
या मोहिमेला २ मार्चपासून ठाण्यातून सुरुवात होणार असून, हा दौरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातूनच सुरू होणार आहे. तसेच, ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसाठी आमदार सुनील राऊत यांनी मुलुंड येथे विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला ९ मार्च रोजी उद्धव ठाकरे स्वताह उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *