मालवणमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; आमदार निलेश राणेंकडून करेक्ट कार्यक्रम

मालवण येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका व्यक्तीने भारताविरोधात घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आणि अखेर प्रशासनाने त्या व्यक्तीच्या भंगार दुकानावर थेट बुलडोझर चालवला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, रोहित शर्माच्या विकेटनंतर मालवणमधील एका दुकान मालकाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली. या प्रकरणी कारवाई करत मालवण नगर परिषद प्रशासनाने त्या व्यक्तीचे भंगार दुकान उद्ध्वस्त केले.
निलेश राणे यांची कठोर भूमिका
या कारवाईचा व्हिडिओ निलेश राणे यांनी एक्स वर शेअर करत प्रशासनाचे आभार मानले. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “मालवणात एका मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने भारतविरोधी घोषणा दिल्या. आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलणारच, पण त्याआधी त्याचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त केला. तातडीने कारवाई करणाऱ्या नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाचे आभार.”
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट्सने सहज विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २४१ धावांचा आव्हान दिले, मात्र टीम इंडियाने सहज लक्ष्य गाठले. विराट कोहलीने अप्रतिम शतक झळकावत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *