केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करताना महाकुंभ मेळाव्याला गैरहजर राहणे म्हणजे हिंदूंचा अपमान असल्याचा आरोप केला आहे. तसेच, हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही केले आहे.
रामदास आठवले म्हणाले त्यांनी ठाकरे आणि गांधी यांनी हिंदुत्वाबद्दल बोलताना प्रत्यक्ष कृती दाखवली पाहिजे, असे म्हणत त्यांना लक्ष्य केले.
“ठाकरे आणि गांधी कुटुंबाने महाकुंभ मेळ्यात सहभागी न होऊन हिंदूंच्या भावनांचा अपमान केला आहे. हिंदू असणे म्हणजे केवळ घोषणा देणे नव्हे, तर त्यांच्या परंपरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणे गरजेचे आहे. हिंदूंनी याचा विचार करूनच आपला निर्णय घ्यावा,” असे त्यांनी पीटीआय व्हिडिओजशी बोलताना सांगितले.
आठवले यांनी या दोन्ही नेत्यांवर हिंदू मतदारांकडून मते मिळवण्याची अपेक्षा ठेवूनही महत्त्वाच्या धार्मिक मेळाव्याला उपस्थित न राहिल्याबद्दल टीका केली.
“ते नेहमी हिंदू मतांची मागणी करतात, मात्र जेव्हा हिंदू संस्कृतीशी संबंधित मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहायची वेळ येते, तेव्हा ते मागे सरतात. त्यामुळे हिंदू मतदारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे,” असे आठवले यांनी ठामपणे सांगितले. मागील नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी या नेत्यांना योग्य धडा शिकवला असल्याचा दावा आठवले यांनी केला.”मतदारांनी आधीच संकेत दिले आहेत की हिंदू धर्माच्या भावना जपल्या नाहीत, तर त्याचा फटका राजकीय स्तरावर बसू शकतो. ,” असे ते म्हणाले.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगम येथे ४५ दिवस चाललेल्या महाकुंभ मेळाव्याचा समारोप महाशिवरात्रीला झाला. या भव्य धार्मिक सोहळ्यात कोट्यवधी श्रद्धाळूंनी सहभाग घेतला, मात्र विरोधी नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली.

‘राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंनी केला हिंदूंचा अपमान’; रामदास आठवलेंचा आरोप!
•
Please follow and like us:
Leave a Reply