शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठे आरोप करत, त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अनेक घोटाळ्यांत सहभागी होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA, मुंबई महापालिका आणि रस्ते प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला.
एवढेच नाही, तर शिंदे सरकारच्या कार्यकाळात सरकारी दवाखान्यांसाठी घेतलेल्या औषधांमध्येही मोठा घोटाळा झाला. ठाकरे यांनी सांगितले की, सरकारने ज्या कंपनीकडून औषध खरेदी केली, ती कंपनीच अस्तित्वात नव्हती. प्रयोगशाळा चाचणीत औषधांमध्ये केवळ पावडर असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. तसेच, आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात कोणतेही समन्वय नव्हते, त्यामुळे संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आरोप केला की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बंद करण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावत एक निवेदन जारी केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बंद करण्यात आला नव्हता. २०२३ मधील RTI माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात दोन वर्षांत या कक्षासाठी ७९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याचवेळी, देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ६१४ कोटींची वाढ झाली होती, तर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एका वर्षात केवळ ६५ कोटी रुपयांची वाढ झाली.
Leave a Reply