शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पाठवले आभाराचे पत्र, कौतुकही केले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले कौतुक केले आणि एक मागणीही केली आहे.दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्धाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. या संमेलनाचे स्वागतअध्यक्ष हे शरद पवार असल्याने त्यांनी पंतप्रधानांनी या संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहेत.

काय लिहलय पत्रात?

‘तुमचे सखोल आणि अंतरदृष्टी पूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झाले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती.

या साहित्य संमेलनाच्या मंचावरून दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती बसवण्याचा प्रस्ताव माडण्यात आला होता, साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेने हा प्रस्ताव मांडला होता. अनेक साहित्यिकांची ही मागणी असल्याचे यावेळी समोर आले आहे. अनेक साहित्यिकांची ही मागणी असल्याचे यावेळी समोर आले आहे.

वास्तविक पूर्ण आकाराचे घोडेस्वार पुतळे उभारले जावेत, अशी साहित्यिकांची मागणी आहे. मात्र हे स्टेडियम नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या या दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेकडून घ्यावा लागणार आहेत, या संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *