येवला- ( नाशिक ) भारतातील पहिले संविधान लोककला-साहित्य संमेलन 23 मार्च रोजी येवला नगरीत संपन्न होणार असल्याची माहिती संविधान लोककला साहित्य संमेलनाचे आयोजकांनी दिली. भारतीय संविधानिक विचार,तत्व,मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन विविध सांस्कृतिक कलाविष्कारातून लोकरांजनातून लोक प्रबोधन-सामाजिक प्रबोधन करण्याच्या उद्देशाने लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र यांच्या वतीने व शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे,पंचायत समिती येवला-शिक्षण विभाग,भारतीय अकॅडमी,कास्ट्राईब शिक्षक संघटना,राष्ट्र सेवादल,अध्यापकभारती येवला यांच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील नामवंत कलावंत या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती प्रवर्तक,निमंत्रक शरद शेजवळ व संयोजक बार्टी पुणे चे महासंचालक सुनील वारे, संविधान कक्ष संचालक सुमेध थोरात पंचायत समिती येवला गट शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर,शैलेंद्र वाघ,राजरत्न वाहुळ,विनोद सोनवणे,गोकुळदास वाघ यांनी दिली आहे.
यांची उपस्थितीती राहणार
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत,उदघाटक सुप्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे,लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे विश्वस्त सल्लागार सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते पार्श्वगायक नंदेश उमप हे स्वागताध्यक्ष असतील.संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे,साहित्यिक तहसीलदार येवला आबा महाजन,गटविकास अधिकारी संदीप वायाळ,गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर,नाशिक जिल्ह्या ग्रामीण पोलीस उपायुक्त वासुदेव देसले,सुप्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब कापसे,राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे,सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहन अडांगळे,राहुल बच्छाव,प्रा.डॉ.भाऊसाहेब गमे,एस.पी.पवार,येवला तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक गायकवाड,येवला नगरपालिका मुख्याधिकारी तुषार आहेर,जेष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ,एस.एस.गायकवाड, दत्तकुमार उटावळे,कास्टईब शिक्षक संघटना पदाधिकारी कार्यकर्ते,शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
संविधान कीर्तन,भारुड, कव्वालीचं सादरीकरण
संमेलनात भारतीय संविधान यावर सुप्रसिद्ध संविधान कीर्तनकार शामसुंदर महाराज किर्तन सादर करणार असून शाहीर स्वप्निल डुंबरे संविधान पोवाडा,शाहीर हमीद सय्यद संविधान भारुड, शाहिरा रितू गोरे संविधान अभंग, शाहीर प्रा.तुळशीराम जाधव संविधान शाहिरी जलसा- संविधान कव्वाली प्रा.शाहीर प्रवीण जाधव संविधान कलगीतुरा व भेदकी शाहिरी सुप्रसिद्ध खंजेरी वादक शाहिरा मीराबाई उमप संविधान प्रबोधन गीते तर लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक नाशिक संविधानाच्या जात्यावरील ओव्या सादर करणार आहे.
यांच्या उपस्थितीत होणार संमेलनाचे समारोप
संमेलनाच्या समारोप सत्रात संविधान संवर्धनासाठी लोककलाकारांची भूमिका या विषयावरील परिसंवादात सुप्रसिद्ध सिनेनाट्य गायक अभिनेते व लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे विश्वस्त नंदेश विठ्ठल उमप सामाजिक कार्यकर्ते संतोष बुरंगे पाटील सहभागी होणार आहेत. मानवाने श्रमपरिहारसाठी विविध कला विकसित केल्या समाजात रूढ झालेल्या विविध प्रकारच्या लोककला ह्या लोक प्रबोधनाचे कार्य करू शकतात यास भारतभूमीत मोठा वारसा आहे.बुद्धकालीन कला ते आजच्या आधुनिक कला प्रकारात लोकांच्या धडावर लोकांचा मेंदू राहावा आणि लोक रंजनातून लोकप्रबोधन व्हावे ह्या हेतूने आपणा भारतीय लोकांना ज्या राष्ट्रग्रंथाने माणुसकीचे मानवतेचे हक्क अधिकार बहाल केले त्या राष्ट्रग्रंथातील अर्थात संविधानातील तत्त्वविचार मूल्यांचा प्रचार प्रसार व संवर्धन विविध प्रबुद्ध लोककलांमधून करण्याच्या हेतूने भारतातील पहिले संविधान लोककला साहित्य संमेलन आपण आयोजित केले आहे असे मत संविधान लोककला साहित्य संमेलनाचे प्रवर्तक व निमंत्रक शरद शेजवळ यांनी सांगितले.
अशी असणार कार्यक्रमाची रूपरेषा
23 मार्च रोजी सकाळी.७:३० वा.संविधान सन्मान रॅली आझाद चौक येवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन संमेलन स्थळी जनता विद्यालय विंचूर रोड येवला इथपर्यंत येईल ९:०० वा.चहा व नाश्ता उद्घाटन सत्र सकाळी ९:३० ते ११ वा. सकाळी ११ ते १२ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार मा श्याम सुंदर सुंदर महाराज (परळी वैजनाथ)यांचे संविधान कीर्तन ११:३० ते १२ वाजता सुप्रसिद्ध शा. इंजिनिअर स्वप्निल डुंबरे (सिन्नर) यांचा संविधानाचा पोवाडा दु.१२ ते १२:३० वा. सुप्रसिद्ध भारूडकार शाहीर हमीद सय्यद (शेवगाव-अहिल्यानगर),१२:३० ते १ संविधान अभंग सादरकर्ते कुमारी रितू गोरे व सहकारी येवला,१ ते २ भोजन,२ ते २:३० संविधान शाहिरी जलसा सादर करते प्रा.शा.तुळशीराम जाधव आणि सहकारी (संगमनेर),२:३० ते ३ वा. संविधान प्रबोधन गीत गायन सादरकर्त्या शाहिरा मीराबाई उमप (छत्रपती संभाजीनगर) ३ ते ३:३० वा. संविधान जात्यावरच्या ओव्या सादरकर्ते लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक येवला दुपारी ३:३० ते ४:०० वा. शाहीर तुषार सूर्यवंशी व गायिका स्वाती त्रिभुवन (मुंबई) यांचे संविधानाचे गाठोडेचे सादरीकरण,सायं ४ ते ५ वा.परिसंवाद – विषय : संविधान संवर्धनासाठी लोककलावंतांची भूमिका अध्यक्ष शाहीर संभाजी भगत,सुप्रसिद्ध सिनेनाट्य गायक व अभिनेता नंदेश विठ्ठल उमप,संतोष बुरंगे यांचा सहभाग असेल.
Leave a Reply