राज्यात विधानसभा निवडणुका होऊन अनेक महिने उलटले, तरी अद्याप महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नाही. आज होईल… उद्या होईल असं म्हणता म्हणता तब्बल तीन वर्षे महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही संभ्रमात असून, त्यांचा उत्साहही मावळला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. नुकतीच महानगरपालिका अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग यांच्यात बैठक झाली, ज्यामध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तरी निवडणुका ऑक्टोबरनंतरच होतील, असे सांगितले जात आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. मे महिन्यात निकाल लागला तरीही मुंबई महानगरपालिका निवडणुका पावसाळ्याआधी होणार नाहीत, असे दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान १०० दिवसांचा कालावधी आवश्यक असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होतील, असे संकेत मिळत आहेत.
Leave a Reply