अनिल परबांनी मनीषा कायंदेंवर त्यांचा जुना ट्विट दाखवत केली टीका; म्हणाले ‘सरड्या पण लाजला’

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिशा सालियान केसची पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी गुरुवारी विधानपरिषदेत केली. त्यांनी हा मुद्दा उचलताचं उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी कायंदे यांचा जुना ट्विट दाखवत सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला, सरड्या पण लाजला, आशा शब्दात त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ पाहायला मिळाला.

 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन पुन्हा एकदा चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली. यावरुनच विधानपरिषदेत घमासान पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. या केसमध्ये सीआयडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. सरकारने एसआयटीही लावली आहे. याआधी पूजा चव्हाणवरुनही संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. त्याचे पुढे काय झाले? असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.

 

आदित्य ठाकरेंवर चौकशीचा प्रस्ताव आणला. त्याा मनिषा कायदेंचे ट्वीट मी वाचून दाखवतो. ‘सत्य परेशान हो सकता हे, पराजित नही’ याची प्रचिती देशवासीयांना आली आहे. दिशा सालियानचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याचे सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे. पण भाजपा आणि राणे गँगने त्याचा संबंध जोडून थयथयाट केला. आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी,असे ट्वीट अनिल परब यांनी वाचून दाखवले. मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असेल तर त्याची काळजी कोर्ट घेईल. संजय राठोड, जयकुमार गोरेंची केस, त्यांचे उघडे नागडे फोटो दिसले त्याबद्दल का बोलत नाही? किरीट सोमय्यांची केसचे काय झाले? असे म्हणत अनिल परब यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *