मुंबईतील खार परिसरात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी रविवारी एका हॉटेलमध्ये जोरदार तोडफोड केली. या हॉटेलमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या शोचे शूटिंग झाले होते, जिथे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असा टोला लगावला होता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि थेट हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये धडक मारली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल कामराच्या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला, ज्यामध्ये त्यांनी हिंदी चित्रपट ‘दिल तो पागल’ है मधील गाण्याचा बदललेला स्वरूपात वापर करून शिंदेंवर उपरोधिक टीका केली. हा व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ‘कुणाल का कमाल’ असे कॅप्शन देत X (माजी ट्विटर) वर शेअर केला. यावर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी खार येथील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये घुसून तोडफोड केली आणि कुणाल कामराविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
या घटनेनंतर शिवसेना खासदार नरेश मसेके यांनी कामराला गंभीर इशारा दिला. “शिवसैनिक तुझा संपूर्ण देशभर पाठलाग करतील. तुला भारतातून पळून जावं लागेल!” असं त्यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलं. दरम्यान, शिवसेना (उद्धव गट) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. स्टुडिओवर झालेला हा हल्ला भ्याड कृत्य आहे,” असं ते सोमवारी रात्री म्हणाले.
Leave a Reply