मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त गाणं बनवून ते प्रसिध्द केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून आता प्रतिक्रिया यायला सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत बोलताना या प्रकारणाकर भाष्य करत कुणाल कामरावर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. हा वादातून प्रसिद्धी मिळवण्याचा कुणाल कामराचा हव्यास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कुणाल कामरावर झालेल्या वादावर निवेदन केले. ते म्हणाले, सभागृहात उपस्थित झालेला विषय अतिशय गंभीर आहे, आपण कुणीही अशा प्रकारच्या विचाराचे नाही की कुणी आपले मत अभिव्यक्त करू नये. किंबहुना हास्य असेल किंवा व्यंग असेल, त्याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. एखादे राजकीय व्यंग झाले तरी, त्या व्यंगातून आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही.
अभिव्यक्ती स्वतंत्र मानणारे लोक आपण आहोत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. खरे म्हणजे, हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा त्याचा इतिहास पाहिला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो अथवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचे बोलणे, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीने बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला एकप्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टर्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की, 2024 च्या निवडणुकीने जनतेनेच ठरवून दिले की, कोण खुद्दार व कोण गद्दार, असं फडणवीस म्हणाले.
Leave a Reply