ठाणे : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स पाठवला आहे. कुणाल कामराने चौकशीसाठी मंगळवारी उपस्थित राहावे यासाठी पहिला समन्स बजावण्यात आला होता. त्याच्या उत्तरात कुणाल कामराने आपल्या वकिलामार्फत 8 दिवसाचा कालावधी मागितला होता. मात्र त्याची ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून त्याला दुसऱ्यांदा समन्स जारी करण्यात आला आहे. त्यानुसार त्याला लवकरच खार पोलिसात हजर राहण्यास सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता कुणाल कामराने विडंबनात्मक गीत सादर केले होते. याप्रकरणी शिंदेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्याची तोडफोड करत गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेत पण पाहायला मिळाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल कामराला मंगळवारी पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी पहिले समन्स बजावले होते. आता पोलिसांनी त्याला दुसरे समन्स बजावले आहे.
हा समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आला आहे. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबईत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दम्यान, कामराने बुधवारी नवीन चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली. त्यात महागाई व ‘निर्मलाताई यांच्यावर विडंबनात्मक गाणे गायले आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. ठाणे जिल्ह्यातील एक नेते असा उल्लेख करून त्यांनी विडंबनात्मक गाणे गायले. त्यामुळे एकमेकां प्रतिच्या भावना कलुषित होऊन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेष भावना निर्माण होत आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Leave a Reply