डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आता सूर्यवंशी कुटुंबीयांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर स्वतः बाजू मांडणार आहेत. रविवारी त्यांनी याबाबत माहिती दिली. या याचिकेवर ८ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतूनच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने केला जात आहे. मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालातही त्यांच्या शरीरावर गंभीर मारहाणीचे व्रण असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, कुटुंबीयांच्या वतीने विजयाबाई सूर्यवंशी यांनी हत्येचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास डिसेंबर २०२५मध्ये सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे .
Leave a Reply