मुंबईत १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (WAVES 2025) या भव्य जागतिक परिषदेच्या माध्यमातून भारत जागतिक मनोरंजन आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे. ही परिषद भारताच्या अफाट मनोरंजन क्षमता, प्रतिभा आणि सर्जनशीलतेचं जागतिक स्तरावर प्रभावी सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच भारताच्या सामर्थ्याला जागतिक व्यासपीठावर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ही परिषद म्हणजे त्यांचं स्वप्न साकार करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेष म्हणजे, या भव्य परिषदेचं आयोजन महाराष्ट्रात होत असल्यामुळे याचं महत्त्व अधिकच वाढतं.फडणवीस यांनी सांगितले की, “जगभरात आणि भारतातही मनोरंजन क्षेत्राचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. ‘वेव्हज 2025 मध्ये १०० हून अधिक देशांमधील सुमारे ५,००० प्रतिनिधी सहभागी होणार असून, यामुळे मुंबईचं जागतिक मनोरंजन नकाशावरील स्थान अधिक बळकट होईल.”’वेव्हज शिखर परिषद दरवर्षी मुंबईतच भरवली जाते, याकडे लक्ष वेधत फडणवीस म्हणाले की, “यामुळे मुंबईचं जागतिक महत्त्व दरवर्षी वाढत आहे.याशिवाय मालाडमध्ये माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ताब्यातील २४० एकर जागेवर एक ‘मनोरंजन हब’ उभारण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. “या पुढाकारामुळे जगभरातील मनोरंजन उद्योग मुंबईत स्थिरावण्यास मोठा हातभार लागेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती
•
Please follow and like us:
Leave a Reply