ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या आंदोलक रहिवाशांची आज अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी स्थानिकांच्या पर्यावरणीय चिंता आणि हरित पट्ट्याच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर एमएमआरडीए व रहिवाशांमध्ये समोपचारासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे.शनिवारी झालेल्या आंदोलनानंतर ठाणे पोलिसांच्या मध्यस्थीने आज मंगळवारी सायंकाळी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भुयारी मार्गाचा मार्गक्रमण बदलून, तो मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत वळवण्याचा प्रस्ताव चर्चेत येणार आहे.विशेष म्हणजे,मुंबई आयआयटीने यासंदर्भात केलेल्या अभ्यासाचा अहवालही या बैठकीत सादर होण्याची शक्यता आहे. बैठकीला एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अभियंता विशाल जांभळे सहभागी होणार असून,स्थानिक रहिवासी नितीन सिंग आणि डॉ.लतिका भानुशाली यांनीही या बैठकीची पुष्टी दिली आहे.
मुल्लाबाग परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सानिध्यात असल्याने अत्यंत निसर्गरम्य आहे.परंतु भुयारी मार्गाच्या कामामुळे या परिसरातील जुने वृक्ष तोडले गेले असून,हरित पट्टा धोक्यात आला आहे. खोदकामातून निघणाऱ्या मातीची शेकडो डम्परद्वारे वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी आणि प्रदूषण वाढले आहे.यासाठी बसवलेली यंत्रणा देखील सध्या बंद आहे, यामुळे स्थानिकांचे जीवन अस्वस्थ झाले आहे.रहिवाशांनी स्पष्ट सांगितले की, त्यांना प्रकल्पाला विरोध नाही; मात्र प्रस्तावित रस्ते मार्ग ऐवजी संपूर्ण मार्गच भुयारी ठेवण्यात यावा,आणि पथकर नाका निवासी संकुलांपासून दूर असावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पूर्वीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी मुंबई आयआयटीकडून अभ्यास करून अहवाल देण्याचे आश्वासन दिले होते, पण तो अहवाल अद्याप सादर करण्यात आलेला नाही.
रहिवाशांची मागणी काय ?
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग मुल्लाबाग येथून रस्ते मार्गे पुढे नेण्यात येणार असून येथील संकुलांच्या प्रवेशद्वाराजवळच पथकर नाका उभारला जाणार आहे. त्यामुळे भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण हा मार्ग रस्ते मार्गे नेण्याऐवजी मुल्लाबाग ते युनी अबेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. या संदर्भात रहिवाशांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली होती. त्यावेळी याबाबत मुंबई आयआयटीमार्फत अभ्यास करून पाहाणी अहवाल सादर करू असे आश्वासन दिले होते. मात्र, हा अहवाल अद्याप रहिवाशांपुढे सादर करण्यात आलेला ना
ही.
Leave a Reply