रोहित शर्माला वानखेडेमध्ये हक्काचं स्थान! वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला हिटमॅनचं नाव

रोहित शर्मा हे नाव भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं टी२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तसेच वनडे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्माच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या गौरवासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला रोहित शर्माचं नाव देण्यात येणार आहे. आज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या सोबतच शरद पवार आणि अजित वाडेकर यांच्या नावांचाही समावेश करण्याचा निर्णय झाला आहे.रोहितचा झळाळता प्रवास – विजयी नेतृत्वाची ओळख

आयपीएलच्या पलीकडे रोहित शर्माचा क्रिकेट कारकिर्देचा प्रवास हा प्रेक्षणीय राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये टी २० विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०२३ च्या ५० षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत भारताला पोहोचवणारा रोहित, ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही संघासह अंतिम टप्प्यापर्यंत गेला. IPL मध्येही मुंबई इंडियन्सला ५ वेळा विजेतेपद मिळवून देणारा रोहित हा भारताच्या आधुनिक क्रिकेटचा आधारस्तंभ ठरला आहे.

मंगळवारी एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, वानखेडे स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियनचा तिसरा मजला आता ‘रोहित शर्मा स्टँड’ म्हणून ओळखला जाईल. त्याचबरोबर, ग्रँड स्टँडचा तिसरा मजला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर, तर चौथा मजला भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नावावर करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव अजित वाडेकर. १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी ३७ कसोटी व दोन एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ मध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला. २०१८ मध्ये वाडेकर यांचं निधन झालं, पण आजही ते भारतीय क्रिकेटमध्ये आदराने स्मरणात आहेत.

हिटमॅन रोहितचा सन्मान 

२०१३ मध्ये कसोटी पदार्पण करणारा रोहित अनेक महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. आता रोहितला त्याच्या घरच्या वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावावर एक स्टँड होणार आहे. २०२२ मध्ये कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, रोहितने २०२४ मध्ये भारताला टी २० विश्वचषक आणि या वर्षी मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. या स्पर्धा जिंकणे फार महत्त्वपूर्ण गोष्ट होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *