तुम मराठी लोग गंदा है…”, घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद

मायानगरी मुंबईतील घाटकोपर परिसर पुन्हा एकदा मराठी-गुजराती वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. सामाजिक सलोखा आणि बहुसांस्कृतिक सहजीवनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या भागात, मराठी कुटुंबांवर झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.एका उच्चभ्रू सोसायटीत चार मराठी कुटुंबीयांना त्यांच्या खानपानाच्या सवयींवरून लक्ष्य करण्यात आले. या सोसायटीमध्ये प्रामुख्याने गुजराती, जैन आणि मारवाडी रहिवासी असल्याने, मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबांकडे द्वेषभावनेने पाहिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तुम मराठी लोक घाणेरडे आहात, मटण-मच्छी खातात, अशा अपमानास्पद भाषेत एका शाह नावाच्या व्यक्तीने सातत्याने मराठी कुटुंबांची खिल्ली उडवली, असा गंभीर आरोप आहे. ही केवळ भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करणारी घटना नसून ती धार्मिक आणि सामाजिक दादागिरीचे हृदयद्रावक उदाहरण बनली आहे.घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तत्काळ संबंधित सोसायटीत दाखल झाले. मनसेचे राजू पार्टे यांनी यासंदर्भातील व्हिडीओ आणि माहिती सोशल मीडियावर शेअर करत हे प्रकरण जनतेसमोर आणले. या घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संबंधित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘इथून पुढे जर मराठी कुटुंबांना त्रास दिला गेला, तर 4 जणांसाठी 4000 लोक तयार असतील.’ मनसेचे राजू पार्टे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले. काही रहिवाशांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र मनसैनिकांनी “मराठी समाजावर अन्याय सहन केला जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला.

या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाषा, खाद्यसंस्कृती आणि राहणीमान यांच्या आधारावर होणारा भेदभाव केवळ मराठींसाठी नव्हे, तर मुंबईसाठीही धोक्याची घंटा आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.गेल्या काही वर्षांत मराठी लोकांना घर भाड्याने अथवा खरेदीस नकार दिल्याच्या घटना वाढत चालल्या असून, ही त्याचाच एक विकृत आविष्कार मानली जात आहे.या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मराठी समाजाला त्यांच्या खाद्यसंस्कृतीवरून किंवा भाषेवरून चुकीची वागणूक देण्याचा हा प्रकार स्वीकारण्यासारखा नाही. ‘जर वेळीच राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर पावले उचलली नाहीत, तर मराठी अस्मितेचा हा लढा आणखी उग्र स्वरूप धारण करेल,’ असा इशारा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *